साहेब तुम्ही कार चालवू नका, टॅक्सीने घरी जा’; मद्यधुंद IT इंजिनीअरने ऐकलं नाही, काही क्षणात पुण्यातल्या पबमध्ये आक्रित घडलं

पुण्यातील कल्याणीनगरमधील एका पबबाहेर काल रविवारी दुपारी मद्यधुंद अवस्थेतील चालकामुळे एका तरुण कर्मचाऱ्याचा बळी गेल्याची धक्कादायक घटना घडली. अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी वाहनचालकाला ताब्यात घेतलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पबमध्ये मित्रांसोबत प्यायला बसला

घटनेमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव सत्येंद्र मंडल (वय 30, मूळ बिहार) असं आहे. तो संबंधित पबमध्ये मागील काही महिन्यांपासून काम करत होता. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीत मदत करण्यासाठी तो पुण्यात स्थायिक झाला होता, अशी माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली. अपघात करणारा चालक प्रतापसिंह कायंगडे (वय 49) हा मूळचा नवी मुंबईतील नेरूळ भागातील असून सध्या धानोरी येथे राहत आहे. तो येरवड्यातील एका प्रतिष्ठित आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने तो दुपारी कल्याणीनगरमधील पबमध्ये मित्रांसमवेत गेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *