सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरामधील शेंडगे प्लॉटमध्ये राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून करण्यात आला. हत्या प्रकरणातील संशयित आरोपी पोलीस स्टेशनमध्ये स्वतः हजर झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते. हा खून का झाला याबाबत पोलीस तपास सुरू आहे आहे. पूनम निरफळ असं हत्या झालेल्या महिलेचं नाव असून पूनम या औषधशास्त्र विषयात पदविकाधारक होत्या. केतन प्रकाश जैन असं संशयित आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी 3 ते 5 वाजेच्या दरम्यान पूनम रोडे-निरफळ यांचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पती दुसऱ्या जिल्ह्यात कामासाठी जात असल्याने पूनम या आपल्या इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या मुलासह बार्शी येथे राहत होत्या. सोमवारी सायंकाळी 5 च्या दरम्यान पूनम फोन घेत नसल्यामुळे घरी आलेल्या पतीने घर बंद असल्याचे कळाल्यामुळे गेटवरून घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांना आपली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.
दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपी केतन प्रकाश जैन हा मध्यमवयीन युवक पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. केतन याने पोलिसांना मी सदर गुन्हा केल्याचे सांगितल्याची प्राथमिक माहिती आहे.
विवाहित महिला या औषध प्रतिनिधी
पूनम रोडे-निरफळ यांच्या हत्येबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे करत आहेत. पूनम रोडे या औषधशास्त्र विषयात पदवीधर होत्या. बार्शीत औषध प्रतिनिधी म्हणून नोकरी करत होत्या. त्यांच्या हत्येनं शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
