सुट्टी घेतली म्हणून सेवासमाप्ती, कुलगुरूंचा वादग्रस्त निर्णय, ‘जेएनयू’मधील धक्कादायक प्रकार

द्यकीय कारणांमुळे सुट्टी घेतली, म्हणून महाराष्ट्रातील एका प्राध्यापकाची सेवा समाप्त केल्याचा प्रकार जवाहरलाल नेहरू विद्यापीठात ( जेएनयू ) घडला आहे. या संपूर्ण प्रकाराबाबत ‘जेएनयू’च्या प्राध्यापकांमध्ये संतापाची भावना असून, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिक्षक संघाने प्राध्यापकावरील कारवाईचा निषेध केला आहे; त्याचप्रमाणे संबंधित प्राध्यापकाच्या सेवा समितीचा आदेश तातडीने मागे घेण्याची विनंती शिक्षक संघाने केली आहे.

सामाजिक विज्ञान शाळेतील प्राध्यापक डॉ. रोहन चौधरी यांची नियुक्ती मार्च २०२४ मध्ये झाली. त्यानंतर १२ महिन्यांच्या परिविक्षाधीन कालावधीवर ते विद्यापीठात रुजू झाले. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, तो अचानक न सांगता सहा महिन्यांनी वाढविण्यात आला. या काळात लहान मुलाची तब्येत बिघडल्याने डॉ. चौधरी यांना नियमित सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त काही दिवस वैद्यकीय कारणांमुळे सुट्टी घ्यावी लागली. या काळात त्यांना ई-ऑफिसवर लॉग इन करून रजेचा अर्ज करण्यास जमले नाही. मात्र, त्यांनी विभागप्रमुखांना याबाबत माहिती दिली होती. असे असतानाही कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडित यांनी डॉ. चौधरी यांच्या रजेची चौकशी करण्यासाठी समिती नेमली. या समितीने डॉ. चौधरी यांनी ५१ दिवसांची सुट्टी घेतली असून, रजेचे व ‘सीसीएस’ नियमांचे उल्लंघन केले, असा उल्लेख अहवालात केला आहे. मात्र, नेमके कोणते नियम मोडले याचा ठोस संदर्भ दिलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *