लातूर येथे व्हाट्सअॅप ग्रुपच्या अॅडमीनला अटक

लातूर येथे व्हाट्सअॅप ग्रुपच्या अॅडमीनला अटक

लातूर जिल्ह्यातील एका व्हाट्सअॅप ग्रुपच्या अॅडमीनला आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील चाकूर तहसील पोलिसांनी व्हाट्सअॅप ग्रुप अॅडमीन आणि अन्य तीन सदस्यांना अटक केली. व्हाट्सअॅपवरील ग्रुपवर एक व्हीडिओ क्लिप पोस्ट केली होती.

याबाबत चाकूर पोलीस स्टेनशच्या पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली. शिवाजी बर्चे, राजकुमार तेलंगे, अमोल सोमवंशी आणि मनोज लव्हराले यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर आयटी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *