महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, CM फडणवीसांनी बैठकीत दिली माहिती

महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य सरकार आणि मठ पुनर्विचार याचिका दाखल करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लोकप्रतिनिधी व संबंधितांच्या  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. अजित पवार, चंद्रकांत पाटील, गणेश नाईक, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, प्रकाश आबिटकर या बैठकीत उपस्थित होते. तसंच नांदणी मठाच्या प्रतिनिधींसबोत प्रकाश आवाडे, राजू शेट्टी, सतेज पाटील, सदाभाऊ खोत, धैर्यशील माने आणि इतरही लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठासोबत सांगितलं असल्याची माहिती मिळत आहे.

34 वर्षांपासून माधुरी हत्तीण नांदणी मठात असून, हत्तीण परत आली पाहिजे, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. मठाने एक याचिका दाखल करावी आणि सोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करेल, आणि तसे सुप्रीम कोर्टात सांगेल. तिची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल. रेस्क्यू सेंटर, आहार याबाबतीत सुद्धा राज्य सरकार आपल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाला आश्र्वस्त्त करेल. राज्य सरकार पूर्ण ताकदीने नांदणी मठाच्या सोबत असेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *