सांगली येथील सर्वोदय विध्यालायाच्या नववी इयत्तेत शिकणाऱ्या शुभम गोरे या विध्यार्थ्याने सडक्या केळापासून इथेनॉल निर्मिती केली आहे.
हे इथेनॉल अत्यंत शुद्ध स्वरूपातील असल्याने दुचाकी मोटार सायकल १००% इथेनॉलवर चालवून त्याने दाखवली आहे. इतकेच नव्हे तर या इंधनाची पियुसी टेस्ट घेतली असता पेट्रोलच्या तुलनेत ०.०३४ पी.पी.एम इतका कार्बन मोनॉक्साईड यातून बाहेर पडत असल्याने पर्यावरण प्रदूषण धोका संपूर्णपणे नाहीसा होत असल्याचा दावाही त्याच्या शिक्षकांनी केला आहे.
शिवाय हे जैव इंधन वापरताना गाडीच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल न करता १००% इथेनॉल वापरता येते हे शुभमने सिद्ध केले आहे. शुभमच्या प्रोजेक्टला जिल्हास्थरीय इन्स्पायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात आणि नागपूर येथील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळला आहे. आत्ता डिसेंबर मध्ये दिल्लीच्या राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनामध्ये तो आपला प्रोजेक्ट सादर करणार आहे.
