धर्मांतराचा मास्टरमाइंड जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबाच्या नेटवर्कवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी मोठी कारवाई केली आहे. ईडीच्या सात पथकांनी बलरामपूर जिल्ह्यासह मुंबईतील दोन ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले आहेत. मुंबईतील वांद्रे पूर्व आणि माहिम पश्चिम भागात असलेल्या दोन वेगवेगळ्या इमारतींमध्ये शहजाद शेख नावाच्या व्यक्तीवर छापे टाकण्यात आले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबाचा जवळचा सहकारी नवीन याने शहजाद शेखच्या खात्यात दोन कोटी रुपये ट्रान्सफर केले. हे पैसे मनी लाँड्रिंगचा भाग असल्याचा ईडीला संशय आहे. वांद्रे पूर्वेतील कनकिया पॅरिसमधील शहजाद शेखच्या 20 व्या मजल्यावरील फ्लॅटवर आणि माहिम पश्चिमेतील रिझवी हाइट्सच्या पाचव्या मजल्यावर ईडीने छापे टाकण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, छांगूर बाबावर आरोप आहे की, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात धर्मांतरणाचे रॅकेट चालवले जायचे आणि त्यामाध्यमातून पैशांची देवाण-घेवाण करण्यात यायची. ईडीने या प्रकरणात मनी ट्रेलचा तपास करत आहेत. ईडीला संशय आहे की, अवैध फंडिंगच्या माध्यमातून देशातील विविध ठिकाणी धर्मांतरणाचे रॅकेट चालवले जात होते. त्याचमाध्यमातून ईडीने एकाचवेळी विविध ठिकाणी रेड टाकण्यात आली. तपास यंत्रणांनी शहजाद शेख आणि अन्य संशयित व्यक्तींकडून दस्तावेज, बँक रेकॉर्ड आणि अन्य पुरावे नष्ट केले आहेत. ईडीने ही कारवाई सध्या सुरूच ठेवली आहे.
उत्तर प्रदेश मधील छांगुर बाबाची लोणावळ्यात जमीन
उत्तर प्रदेश येथील एका ढोंगी बाबाने लोणावळा येथे बेकायदेशीर जमीन खरेदी केल्याचं उघड झाले असून, अवैध धर्मांतराच्या गंभीर आरोपांखाली छांगुर बाबा सध्या अटकेत असून छांगुर बाबा उर्फ जमालुद्दीन असं त्याचे नाव आहे. आत्तापर्यंत त्याने 100 कोटींची माया जमवली आहे. त्यापैकी 16 कोटी रुपयांची जमीन लोणावळ्यातील कुणेनामा या गावात सर्व्हे नंबर 40 गट नंबर 1आणि दोन अशी खरेदी केल्याचं उघड झाले आहे. मात्र समोर आलेले जमिनीचे सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे जमिनीचे मालक असलेल्या शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
