नशेत धूंद, अर्धनग्न, मराठी महिलेसोबत… MNS नेत्याच्या मुलाचा प्रताप; मराठी इन्फ्लुएन्सर राजश्री मोरेसोबत गैरवर्तन

हिंदी सक्तीला विरोध करता मराठी भाषेच्या मुद्द्यावर मराठी अस्मितेसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आहेत. पण त्यांचं एकत्र येणं अनेक बाजूंनी सध्या चर्चेचा विषय आहे. अशातच एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एका मनसे नेत्याच्या मुलाने मंद्यधुद्ध अवस्थेत गैरप्रकार केला आहे.

मुंबईतील अंधेरी भागात राखी सावंतची एकेकाळची मैत्रीण राजश्री मोरे हिच्यासोबत मनसे नेत्याच्या मुलाने गैरवर्तणूक केलं आहे. हा व्हिडीओ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय निरुपम यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, दारू पिऊन, अर्धनग्न, मनसे नेत्याचा मुलगा एका मराठी भाषिक महिलेला शिवीगाळ करत आहे. त्याशिवाय, तो मुलगा त्याच्या वडिलांच्या नावाने धमकावत असल्याच दिसत आहे. मराठी स्वाभिमानाचे रक्षण करण्याचा दावा करणाऱ्यांचा खरा चेहरा पहा.

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

मराठी इन्फ्लुएन्सर राजश्री मोरे हिने आरोप केला आहे की, अंधेरी परिसरात एका तरुणाने तिच्या गाडीला धडक दिली. नंतर दारू प्यायलेल्या तरुणाने तिला धमकी दिली की, त्याचे वडील मनसेचे उपाध्यक्ष आहेत. राजश्री मोरे यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी तो तरुण अर्धनग्न अवस्थेत होता. राजश्री मोरेच्या गाडीला धडक देणारा आरोपी मनसे नेते जावेद शेख (Javed shaikh mns) यांचा मुलगा आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्या मुलाचे नाव राहिल जावेद शेख आहे. मनसे नेते जावेद शेख यांचा मुलगा राहिल जावेद शेख याने राजश्री मोरे यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर मुंबईतील अंबोली पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *