पावसाने नाशिकमध्ये कोसळधार सुरु आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. एवढंच नव्हे तर नाशिक शहरात सध्या हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे गेल्या 48 तासापासून पावसाने जोर धरल्यामुळे सर्व धरणे भरू लागली आहेत गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे सोमेश्वर धबधबा खेळायला आहे तसेच सुरगाण्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस सुरु झाला असून पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. परिसरात दरड कोसळून वाहतूकही ठप्प झाली आहे.
नाशिकच्या सुरगाण्याच्या पश्चिम पट्टयात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू असून, अंबिका नदीच्या उपनदीला पूर आल्याने पिंपळसोंड – उंबरपाडा रस्त्यावरील फरशी पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने वाहन चालक व नागरिक जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहे तर आहे.दांडीचीबारी येथे दरड कोसळल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला.अंबिकेची उपनदी भूतकुड्याचा ओहोळ व कुंभारचोंड नदीला पूर आल्याने सकाळपासून सात ते आठ तास वाहतूक ठप्प झाली होती. पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात दरवर्षी हे पुल पाण्याखाली येत असल्याने वाहतूक ठप्प होते.पुलांची उंची वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहे..
नाशिक जिल्ह्यातील 24पैकी निम्मे धरण भरू लागल्यामुळे आता तेरा धरणांमधून विसर्गाला सुरुवात करण्यात आली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण मातीचे धरण असल्यामुळे त्यात 80 टक्के पेक्षा अधिक जलसाठा करणे धोकादायक ठरू शकते म्हणून 60 टक्क्यांवर पातळी नियंत्रित केली जाते आहे गंगापूर धरणासमोर मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
6000 क्युसेक्स वेगाने सोमेश्वर धबधबा प्रवाहित
नाशिक शहरात सध्या हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे गेल्या 48 तासापासून पावसाने जोर धरल्यामुळे सर्व धरणे भरू लागली आहेत .गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे सोमेश्वर धबधबा खळाळून वाहत आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून 43 हजार 882 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेने करण्यात येत आहे निफाड तालुक्यातील गोदावरी काठावर असलेल्या चांदोरी सायखेडा शिंगवे आणि करंजगाव या गावांना पुराचा फटका बसू नये विसर्गात टप्प्याटप्प्याने वाढ करत 43 हजार 882 क्यूसेक पाण्याचा सहा वक्रकार गेटमधून विसर्ग करण्यात येत आहे आज सकाळ पर्यंत 22 टीएमसी पाण्याचा विसर्ग या पावसाच्या हंगामात नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदी पात्रात जायकवाडीच्या दिशेने करण्यात आला आहे
