बाईकच्या आतमध्ये, बाथरुममध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी साप लपल्याचं तुम्ही ऐकलं किंवा पाहिलं असेल. मात्र परभणीत एक अजब घटना समोर आली आहे. येथे साप चक्क टीव्हीच्या आतमध्ये लपला होता. कोणीही कल्पना केली नसलेल्या ठिकाणी या सापाला पाहिल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या. एलईडी टीव्हीतून चक्क एक जिवंत साप बाहेर काढण्यात आल्यानंतर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली.
परभणी शहरातील गव्हाणे चौकातील मारोती दूबाकर यांच्या वृद्ध आई शेवंताबाई दूबाकर टीव्ही बघत होत्या. यावेळी टिव्हीतील हिरव्यागार झाडावर एक साप चढण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांना दिसला. साप दिसत असल्याने त्या अवाक झाल्या. त्यांनी टीचॅनेल बदलले, तरीही साप टिव्हीत दिसत होता. ही बाब त्यांनी इलेक्ट्रिशियन असलेला नातू राजेश आणि मुलगा मारोती दूबाकर यांना सांगितली. शेवंताबाईना चष्मा लागलेला असल्याने त्यांचा विश्वास बसला नाही.
यानंतर त्यांनी टीव्ही उघडण्यास सुरुवात केली. पण यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. टीव्हीचा प्रत्येक पार्ट काढण्यासाठी 40 मिनिटं गेली. टीव्हीतला साप बघणाऱ्याच्या काळजाचे ठोके जोराने पडत होते, टीव्हीत साप कसा जाईल असंच सगळेजण म्हणत होते. पण आजी शेवंताबाई मात्र टीव्हीमध्ये साप आहे आणि आपण सापच बघितला यावर ठाम होत्या.
सर्पमित्र रणजित कारेगाव हे मागील 25 वर्षापासून साप पकडतात. त्यांनी हजारो साप पकडलेले आहेत, पण टीव्हीत साप असल्याचं ऐकून ते आवाक झाले. त्यांचाही विश्वास बसत नसल्याने त्यांनी टीव्हीवरील सापाचा व्हिडीओ करून पाठवायला सांगितले. व्हिडीओ पाहताच त्यांनी मारोती दूबाकर यांच घर गाठून सापाला रेस्क्यू केलं आणि निर्जनस्थळी नेऊन जीवनदान दिलं.
टीव्ही उंड भिंतीवर असताना साप तिथे गेला असा असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तसंच टीव्हीला कुठे छिद्र नसताना साप टीव्हीत गेलाच कसा हा प्रश्न अनुत्तरितच आहे.