मुंबई इंडियन्स फ्रँचायझीचा मोठा निर्णय, निकोलस पूरनची कर्णधारपदी नियुक्ती

वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज निकोलस पूरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि दुसऱ्याच दिवशी त्याच्यावर एक मोठी जबाबदारी सोपावण्यात आली. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने निकोलस पूरनला एमआय न्यूयॉर्क संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

Nicholas Pooran Caption MI New York : निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी नवी जबाबदारी

निकोलर पूरनने 10 जून रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुंबई इंडियन्सने त्याच्यावर विश्वास दाखवत त्याच्याकडे एमआय न्यूयॉर्क संघाचे नेतृत्व सोपवले आहे. गेल्या हंगामात या संघाचे नेतृत्व केरॉन पोलार्डकडे होते आणि त्याच्या नेतृत्वाखाली एमआय न्यूयॉर्कने मेजर लीग क्रिकेटचे जेतेपद जिंकले होते.

आयपीएल 2025 मध्ये, मुंबई इंडियन्स त्यांचे सहावे विजेतेपद जिंकू शकले नाही. संघाला एलिमिनेटर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता फ्रँचायझीने दुसऱ्या लीगसाठी मोठे पाऊल उचलले आहे. निकोलस पूरनकडे मोठी जबाबदारी सोपावण्यात आली.

Nicholas Pooran IPL Performance : आयपीएल 2025 मध्ये पूरनची चमकदार कामगिरी

IPL 2025 मध्ये निकोलस पूरनने लखनऊ सुपर जायंट्ससाठी 524 धावा केल्या. त्यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये पूरनचा स्ट्राइक रेट होता 196.25 इतका होता. लखनऊ सुपर जायंट्सने निकोलस पूरनवर 21 कोटींची बोली लावली होती. पूरनने त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला.

Nicholas Pooran Performance :आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी

एकूण 9 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पूरनने 61 वनडे आणि 106 टी 20 सामने खेळले.

वनडे धावा: 1983 (3 शतकं, 11 अर्धशतकं)

टी 20 धावा: 2275 (13 अर्धशतकं)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *