सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपयांची मागणी- सुरेश धस

पैशासाठी सुनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांमुळे वादात सापडलेल्या पुण्यातील हगवणे कुटुंबाचे नातेवाईक असलेले आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर हेदेखील अडचणीत आले आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी सुपेकर यांच्यावर हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्यासाठी मदत केल्याचा आरोप होता. तसेच वैष्णवी हगवणे यांच्या तक्रारीवर कारवाई न करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच त्यांची बदली करण्यात आली होती. आता धस यांच्या आरोपांमुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

आमदार सुरेश धस यांनी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “आयजी पोस्टवर असलेला माणूस 1 लाख रुपये रोख घेतो आणि 50 हजाराचा मोबाईल घेतो यापेक्षा दुर्दैव काय असावे?”, असे धस म्हणाले. सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून ३०० कोटी रुपये मागितल्याचा आरोपही त्यांनी केला. “जेलमध्ये सुपेकर यांनी कैद्यांना 300 कोटी रुपये द्या, असं म्हटल्याची तक्रार माझ्याकडे आली आहे,” असं धस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *