..आणि आठवलेंना विमानाचं दार बंद झालं!

..आणि आठवलेंना विमानाचं दार बंद झालं!

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते रामदास आठवले यांना मुंबई विमानतळावर वेगळ्याच अनुभवाला सामारं जावं लागलं. जेट एअरवेजच्या स्टाफने विमानात प्रवेश मिळाला नाही. या प्रकारानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विमान कंपनीच्या कार्यालयाबाहेर निषेध नोंदवला.

महाराष्ट्राचे बीडमधील दलित कार्यकर्ते एकनाथ आवाड यांच्या अंत्यसंस्कारासाठी आठवले, मुंबईहून औरंगाबादला निघाले होते.

रामदास आठवले जेट एअरवेजच्या 9W313 या विमानाने पहाटे 5.15 च्या विमानात दाखल होणं अपेक्षित होतं. “विमानाच्या उड्डाणाच्या 27 मिनिटांपूर्वी मी विमानतळावर पोहोचलो होतो. शिवाय मला बोर्डिंग पासही मिळाला होता. परंतु जेट एअरवेजच्या स्टाफने दिलेल्या माहितीने मला धक्काच बसला. ते म्हणाले की, मला विमानात प्रवेश करता येणार नाही, कारण मी 4-5 मिनिटं उशिरा आलो,” असा रामदास आठवले यांनी सांगितलं.

“मी जेट एअरवेजचा एक नेहमीचा आणि शिस्तप्रिय प्रवासी आहे, त्यामुळे मला प्रवासासाठी परवानगी द्यावी,” असंही ते म्हणाले.

या संपूर्ण प्रकाराबाबत मी विमानवाहतूक मंत्र्यांकडे तक्रार नोंदवणार असून राज्यसभेतही हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचं आठवलेंनी स्पष्ट केलं.

त्यानंतर जेट एअरवेजच्या प्रवक्तांनी एक परिपत्रक काढून रामदास आठवलेंच्या आरोपांचा इन्कार केला.

“जेट एअरवेज एअरपोर्ट स्टाफने आठवलेंना विमानाच्या उड्डाणाच्या वेळेबाबतचा प्रोटोकॉल आधीच सांगितलं होता. पण दुर्दैवाने रामदास आठवले विमानतळावर उशिरा पोहोचले. त्यानंतर आम्ही त्यांसाठी पर्यायी प्रवासासाठी ऑफर दिली,” असं या परिपत्रकात म्हटलं आहे.

या संपूर्ण प्रकारानंतर आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी जेट एअरवेजच्या कार्यालयाबाहेर निदर्शनं केली आणि मॅनेजमेंटने आठवलेंची माफी मागावी, अशी मागणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *