14 वर्षीय स्टार क्रिकेटर वैभव सूर्यवंशीला मिळाला PM मोदींचा आशीर्वाद; आई- वडिलांशीही पंतप्रधानांचा संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी ते पाटना विमानतळावर पोहोचल्यावर इथे भारताचा स्टार क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी आणि त्यांचा पालकांशी मोदींची भेट झाली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावरील पंतप्रधान मोदींच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहेत. 14 वर्षांच्या वैभवने या हंगामात आयपीएलमध्ये ऐतिहासिक खेळी खेळून सर्वांना आश्चर्यचकित केलं. बिहारमधील समस्तीपूरमधील रहिवासी असलेल्या वैभवने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध 35 चेंडूत शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. या खेळीच्या जोरावर तो आयपीएलमधील शतक करणारा सर्वात तरुण भारतीय बॅटसमॅन ठरला आहे. तसंच आयपीएलमधील सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडूचा बहुमानही त्याने आपल्या नावावर केला आहे. त्याने युसूफ पठाणचा विक्रम मोडला आहे.

पंतप्रधान मोदी वैभवबद्दल म्हणाले की…

वैभव आणि त्याच्या कुटुंबासोबतचा एक फोटो शेअर करताना पंतप्रधान मोदींनी लिहिलं की, ‘पाटणा विमानतळावर तरुण क्रिकेट सेन्सेशन वैभव सूर्यवंशी आणि त्याच्या कुटुंबाला भेटलो. त्याच्या क्रिकेट कौशल्याचे देशभर कौतुक होत आहे! त्याच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी माझ्या शुभेच्छा.

वैभवची जोरदार खेळी!

डावखुरा फलंदाज वैभवने 28 एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध 38 बॉल्समध्ये 101 रन्स ठोकले होते. यादरम्यान त्याने 11 सिक्स आणि 7 फोर लगावले होते. वैभवने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. वैभवने त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर शार्दुल ठाकूरचा सामना केला आणि पहिल्याच बॉलवर सिक्सर मारून त्याच्यात किती प्रतिभा आहे हे दाखवून दिला होता. त्याच्या पहिल्याच आयपीएल सामन्यात 20 बॉल्समध्ये 34 धावांची खेळी ही वैभवच्या प्रतिभेची झलक होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *