अंकिता भंडारी हत्या प्रकरण: भाजप नेत्याच्या मुलासह तिघांना जन्मठेप, अखेर 2 वर्षांनंतर न्याय झाला

उत्तराखंडमधील बहूचर्चित अंकिता भंडारी हत्याकांड प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाचील मुख्य सूत्रधार पुलकित आर्यवर करण्यात आलेले सर्व आरोप खरे असल्याचा निर्णय कोर्टाने दिला आहे. 18 सप्टेंबर 2022 रोजी यमकेश्वरच्या वनतारा रिसोर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या अंकिता भंडारीची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळं संपूर्ण देशभरात खळबळ उडाली होती. कोर्टाच्या निर्णयामुळं सर्वसामान्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.

अंकिता भंडारी ऋषीकेशयेथील वंतारा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होते. 19 वर्षांच्या अंकिताची हत्या करुन तिचा मृतदेह रिसॉर्टपासून दूर असलेल्या चीला नहर येथे तिचा मृतदेह फेकून देण्यात आला होता. या प्रकरणी भाजप नेत्याचा मुलगा पुलकित आर्य आणि रिसॉर्टमधील दोन कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. भाजप नेत्याच्या मुलाचे नाव समोर येताच देशात एकच खळबळ उडाली होती. तसंच, सुरुवातीला हे प्रकरम दाबण्याचादेखील प्रयत्न करण्यात आला. मात्र स्थानिकांचा दबावामुळं हे प्रकरण उचलून धरण्यात आले. सरकारकडून या प्रकरणी एसआयटीदेखील स्थापन करण्यात आली होती.

कोर्टाने अंकिताच्या हत्येप्रकरणी पुलकितच्या रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांनाही दोषी ठरवले आहे. तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एसआयटीच्या तपासानुसार, पुलकित आर्या त्याच्याच रिसॉर्टमध्ये काही व्हीआयपी गेस्ट आले होते. त्या व्हीआयपी गेस्टना स्पेशल ट्रीटमेंट दिली जायची. पुलकित आर्यने अंकिताही एकदा व्हीआयपी गेस्टना स्पेशल ट्रिटमेंट देण्यास सांगितले. मात्र अंकिताने त्यास नकार दिला. त्यानरुन पुलकित आणि अंकितामध्ये वाद झाले. याच वादातून त्याने तिची हत्या करण्यात आली.

अंकिता भंडारी हत्या प्रकरणातील एसआयटी चौकशीत, वनंतरा रिसॉर्टचा मालक पुलकित आर्यला मुख्य आरोपी बनवण्यात आले. पुलकितविरुद्ध आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत खून, कलम 201 अंतर्गत पुरावे लपविल्याबद्दल, कलम 354 अ अंतर्गत विनयभंग आणि महिलेचा विनयभंग केल्याबद्दल आणि अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *