पश्चिम रेल्वेवर तब्बल 36 तासांचा सर्वात मोठा मेगाब्लॉक; 162 लोकल रद्द होणार

पश्चिम रेल्वेवर तब्बल 36 तासांचा सर्वात मोठा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रविवार आणि सोमवार हा ब्लॉक असणार आहे. जलद मार्गावर हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक दरम्यान 162 लोकल रद्द होणार आहेत. यामुळे प्रवाशांचे मेगा हाल होणार आहत.

कांदिवली यार्ड येथे पश्चिम रेल्वेचा हा मोठा ब्लॉक असणार आहे.  कांदिवली यार्ड येथील एलिव्हेटेड बुकिंग ऑफिस तोडण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. शनिवार 31 मे 2025 रोजी दुपारी दोन वाजेपासून रविवार आणि सोमवार म्हणजे 1 आणि 2 जून 2025 रोजी रात्री दहा वाजेपर्यंत पाचव्या लाईन आणि यार्ड लाईनवर 36 तासांचा हा मोठा ब्लॉक घेतला जाणार आहे.  ब्लॉक दरम्यान, उपनगरीय आणि मेल एक्सप्रेस ट्रेन जलद मार्गावर चालवल्या जातील.

एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक 

  • 30  आणि 31 मे 2025 रोजी सुरू होणारी ट्रेन क्रमांक 19418 अहमदाबाद – बोरिवली एक्सप्रेस प्रवास वसई रोड येथे थांबेल. त्यामुळे, ही ट्रेन वसई रोड आणि बोरिवली दरम्यान अंशतः रद्द केली जाईल.
  • 31 मे आणि 1 जून 2025 रोजी सुरू होणारी ट्रेन क्रमांक 19425 बोरिवली – नंदुरबार एक्सप्रेस प्रवास भाईंदर येथून सुटेल. त्यामुळे, ही ट्रेन बोरिवली आणि भाईंदर दरम्यान अंशतः रद्द केली जाईल.
  • 31 मे 2025 रोजी सुरू होणारी ट्रेन क्रमांक 19426 नंदुरबार – बोरिवली एक्सप्रेस प्रवास वसई रोड येथे थांबेल. त्यामुळे, ही ट्रेन वसई रोड आणि बोरिवली दरम्यान अंशतः रद्द केली जाईल.
  • 1 जून 2025 रोजी सुरू होणारी ट्रेन क्रमांक 19417 बोरिवली – अहमदाबाद एक्सप्रेस वसई रोडवरून सुटेल. त्यामुळे, ही ट्रेन बोरिवली आणि वसई रोड दरम्यान अंशतः रद्द केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *