फ्लॅट नावावर करा म्हणत मोठ्या मुलानेच केली बापाला मारहाण, वडिलांच्या दोन्ही पायांवर…

ज्येष्ठ नागरिकाने त्याच्याच मुलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संपत्तीच्या वादावरुन मुलानेच वडिलांना मारहाण केली आहे. या प्रकरणामुळं एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी मुलाविरोधात तक्रार दाखल करुन घेतली आहे. विजय साटले असं वडिलांचे नाव असून त्यांचे वय 75 आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार साटले हे दहिसर येथे एकटेच राहतात. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर ते दहिसर येथील 1 बीएचके फ्लॅटमध्ये राहत होते. त्यांचा मोठा मुलगा किशोर हा कोकणात राहत होता तर धाकटा मुलगा मिथून हा उपनगरात राहतो. जोगेश्वरी येथे साटले यांचा एक फ्लॅट आहे. त्यावरुनच किशोर आणि त्यांच्या वडिलांचे सतत वाद होत होते. हा फ्लॅट किशोरला स्वतःच्या नावावर करायचा होता. यावरून त्यांच्यात वाद होत होते.

25 मे रोजी सकाळच्या सुमारास तक्रारदार घरी एकटे असताना किशोर त्यांच्या घरी गेला आणि जोगेश्वरीचा फ्लॅट नावावर करण्यासाठी वाद घालू लागता. त्यानंतर दरवाजाच्या मागे असलेल्या लाकडी पट्टीने त्याने वडिलांच्या दोन्ही पायांवर मारायला सुरूवात केली. त्यानंतर साटले जमिनीवर कोसळले. त्यानंतर किशोरने पाठीवरही पट्टीने मारहाण करण्यास सुरूवात केली.

वडिलांना मारहाण करत असताना शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने हे पाहिले. त्यानंतर त्यांनी सटाळे यांच्या दुसऱ्या मुलाला फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर मिथूनने घरी धाव घेत जखमी वडिलांना कांदिवली पश्चिमच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासल्यावर त्यांचे दोन्ही पाय फॅक्चर झाल्याचे निदान करून त्यांना रुग्णालयात दाखल केले. तक्रारदाराच्या मालकीचा जोगेश्वरीच्या हरीनगर परिसरात नवकिरण सोसायटीमध्ये एक फ्लॅट आहे. हा फ्लॅट किशोरला स्वतःच्या नावावर करायचा होता. यावरून त्यांच्यात वाद होत होते. त्यावरुनच ही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *