पुण्यामधून मोठी बातमी समोर आली आहे. खराडी येथे पोलिसांनी प्राईड आयकॉन या इमारतीमधील खोट्या कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. पोलिसांनी रात्री छापा टाकला असून अद्यापही ही कारवाई सुरू आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी अनेक लोकांना ताब्यात घेतले आहे. अमेरिकामधील लोकांना फसवून डिजिटल अटकच्या नावाखाली फसवायचे आणि पैसे मागायचे. बी पी एस अँड कन्सल्टन्सी एलएलपी हे कॉल सेंटर असे या कॉल सेंटरचे नाव आहे.
अनेक लोकांची चौकशी सुरू पाच जणांना ताब्यात घेतले आहे. सायबर फ्रॉड असून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केले असून महत्त्वाचा डाटा सायबर पोलिसांच्या हाती लागला आहे. सायबर पोलीस ६१ लॅपटॉप आणि ४१ मोबाईल जप्त केले आहेत. शंभर ते दीडशे लोक असून त्यामध्ये तरूणींचाही समावेश आहे. सर्व लोक हे गुजरातचे असून मुख्य आरोपीसुद्धा गुजरातचा आहे. पोलिसांनी हे फ्रॉड सायबर सेंटर उद्ध्वस्त केले आहे.