पुणे महापालिकेला मिळाले नवे आयुक्त; IAS नवल किशोर कुमार यांची पंतप्रधान कार्यालयाकडून नियुक्ती

पुणे महानगर पालिकेचे आयुक्त बदलणार आहेत. पुणे महानगर पालिकेचे नवे आयुक्त म्हणून IAS अधिकारी नवल किशोर कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. येत्या 31 मे रोजी विद्यमान आयुक्त राजेंद्र भोसले हे सेवा निवृत्त होत आहे. यानंतर पुणे पालिकेचा कारभार नवल किशोर कुमार यांच्याकडे जाणार आहे. सध्या पालिकेमध्ये प्रशासकराज असून नवल किशोर कुमार यांच्या नवनियुक्तीची सर्वत्र चर्चा आहे.

IAS अधिकारी नवल किशोर कुमार यांनी यापूर्वी अनेक महत्त्वांच्या पदाचा कारभार स्वीकारला आहे. नवल किशोर कुमार हे 2008 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. पुण्यामध्ये त्यांनी यापूर्वी देखील काम केले आहे. IAS अधिकारी नवल किशोर कुमार यांनी यांनी कोरोना काळामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी पद सांभाळले होते. यावेळी पुण्यामध्ये आरोग्य सेवा आणि इतर सर्व आव्हानांना त्यांनी समर्थपणे उत्तर दिले होते. यानंतर आता नवल किशोर कुमार हे पुणे पालिका आयुक्त होणार आहेत.2018  ते 2021 या काळात ते पुण्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीचं व्यापक स्तरावर कौतुक देखील झाल्याच पाहायला मिळालं. याशिवाय पुण्यातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य या बाबतीत त्यांनी केलेल्या कामाची दखल वरीष्ठ पातळीवरून देखील घेण्यात आली. पुण्यातील कार्यकाळानंतर त्यांची केंद्रात पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती करण्यात आली.

नवल किशोर कुमार यांची थेट पंतप्रधान कार्यालयातून पुणे महानगर पालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी नवल किशोर राम यांनी पंतप्रधान कार्यालयात (PMO) महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळली आहे. पीएमओमध्ये ते उपसचिव म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर केंद्रीय अर्थमंत्रालयातदेखील त्यांनी महसूल विभागाचे सहसचिव म्हणून कार्यभार सांभाळला आहे.  यानंतर आता ते पुण्याचे महापालिका आयुक्त म्हणून काम पाहणार आहेत. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहे. यामध्ये पुणे पालिकेचा देखील समावेश आहे. यामुळे नवल किशोर कुमार यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.

पुण्याचे नवे पालिका आयुक्त हे मूळचे बिहारचे आहेत. त्यांनी पूर्व चंपारणचे रहिवासी आहेत. 2000 साली त्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली. मसूरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमीमध्ये त्यांनी एक वर्षाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती नांदेडमध्ये झाली. त्यानंतर यवतमाळ, बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्येदेखील त्यांनी महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर काम केलं आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयातदेखील त्यांनी महसूल विभागाचे सहसचिव म्हणून कार्यभार सांभाळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *