पुण्यात मोठी दुर्घटना! एकाचवेळी 3 ठिकाणी होर्डिंग कोसळले; अनेक वाहने होर्डिंगखाली अडकली

मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावासामुळे पुण्यात मोठी दुर्घटना घडली आहे. एकाचवेळी 3 ठिकाणी होर्डिंग कोसळले आहेत. या होर्डिंगखाली अनेक वाहने अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे. होरंडिंग कोसळल्याच्या दुर्घटनेमुळे पुण्यात प्रचंड वाहतुक कोंडी झाली. घटनास्थळी होर्डिंग हटवण्याचे काम सुरु आहे.

पुणे अहिल्यानगर महामार्गावर होर्डिंग कोसळले आहे. भर चौकातच हे होर्डिंग कोसळले. होर्डिंगखाली अनेक दुचाकी अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  पुण्यात मुसळधार पावसात होर्डिंग  कोसळले. सात ते आठ दुचाकी बोर्डिंग खाली अडकल्या. कोणीही जखमी नाही. पुणे अहिल्यानगर रस्त्यावर वाघोली जवळ सणसवाडी येथे होर्डिंग कोसळले.  पुण्यात आणखीन एक ठिकाणी मुसळधार पावसामुळे होर्डिंग कोसळले आहे.  सणसवाडी आणि फुरसुंगी मंतरवाडी चौक असा दोन ठिकाणी होर्डिंग कोसळले आहे. फुरसुंगीतील मंतरवाडी चौकातही पावसामुळे फ्लेक्स कोसळला आहे.

पुण्यात काल रात्री अवघ्या एक तास झालेल्या पावसाने पुण्यातील चार ठिकाणी पाणी तुंबले. विमानतळ …कात्रज ..हडपसर ..धानोरी  भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचलेले होते. पुणे शहरासह जिल्ह्यात आजही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी पीकांचे नुकसान झाले आहे.

मान्सून पूर्व पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला  आहे.  पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलाय. कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून विदर्भातही काही ठिकाणी पाऊस जोरदार बरसणारेय.पुणे शहरासह जिल्ह्यात आणि घाट परिसरात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम अवकाळी पावसाचा इशारा पुणे हवामान विभागाने दिलाय. ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आलाय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *