आनंदवार्ता! भूमी अभिलेख विभागानं तयार केले क्यूआरकोड; चुटकीसरशी मिळणार शेतजमिनीची नक्कल प्रत

जालन्यातील घनसावंगीच्या भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयानं शेतकऱ्यांसाठी अभिनव ऑनलाईन उपक्रम सुरू केलेत. क्यूआरकोड स्कॅन करा आणि घरबसल्या शेतजमिनीची प्रत मिळवा असा एक अनोखा उपक्रम या विभागानं सुरु केला आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतजमिनीची नक्कल प्रत तात्काळ मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

क्यूआरकोड स्कॅन करा आणि शेतजमिनीची नक्कल घरपोच मिळवा हा उपक्रम जालन्यातील घनसावंगी भूमी अभिलेख विभागाच्या उप अधीक्षकांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला आहे. या प्रयोगामुळे भूमी अभिलेख विभागात शेतकऱ्यांच्या वारंवार होणाऱ्या खेटा थांबल्याचं पहायला मिळालं.

कशी आहे प्रक्रिया?

भूमी अभिलेख विभागानं शेतकऱ्यांसाठी एक क्यूआरकोड उपलब्ध करून दिला. हा क्यूआरकोड मोबाईलमधून गुगल वरून स्कॅन केल्यानंतर एक ऑनलाईन अर्ज भरून घेतला जातो. हा अर्ज भरल्यानंतर भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयात दाखल होतो. हा अर्ज कार्यालयात आल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे कागदपत्र पडताळणी करून शेतकऱ्याला व्हॉट्सॲपवरून शेत जमिनीची नक्कल प्रत पोहचवली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *