पुण्याच्या उच्चभ्रू वस्तीत सुरू होता भलताच प्रकार; बाप-लेकच होते सूत्रधार…

पुण्यात उच्चभ्रू सोसायटीमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली भलताच प्रकार सुरू होता. शहरातील उच्चभ्रू अशा समजल्या जाणाऱ्या बाणेर परिसरात ही घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक म्हणजे बाप-लेकानेच हा धंदा सुरू केला होता. स्पा सेंटरच्या नावाखाली बाणेर येथे सेक्स रॅकेटचा धंदा सुरू होता. पोलिसांनी मिळालेल्या एका टीपने हा प्रकार उघडकीस आला आहे.

बाणेर परिसरातील चार स्पा सेंटरला पुणे पोलिसांनी टाळे ठोकले आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बाप-लेकाला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. बाणेर येथे स्पाच्या नावाखाली चालणारे हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करणाऱ्या स्पा चालक मॅनेजरसह जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर अनेक स्पा सेंटरची पुणे पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. बनावट ग्राहक पाठवून बाणेर पोलिसांनी स्पा सेंटरवर कारवाई केली होती. स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या दोन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सिराज चौधरी आणि वसीम चौधरी असं अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. दोन आरोपींना अटक करत जागा मालकांसह एका महिलेवर देखील बाणेर पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *