इंस्टाग्रामवरील मेसेज ठरला जीवघेणा! पाच भावा-बहिणींनी मिळून पुण्यातील तरुणाचा जीव घेतला

इंस्टाग्रामवर मेसेज पाठवत बहिणीला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून बहिण भावासह पाच जणांनी एका तरुणाला पुण्यातून उचलून कोपरगाव येथील कोकमठाण शिवारात आणत जबर मारहाण केली. इतकंच नव्हे तर त्याची विष पाजून त्याची हत्या केल्याची घटना कोपरगाव तालुक्यात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

साईनाथ गोरक्षनाथ काकडे (वय २४, रा. डोऱ्हाळे ता. राहाता) असे मयत युवकाचे नाव असून सदर तरुणाच्या घरी घटनेची माहिती मिळाल्यानंतर तरुणाला जखमी अवस्थेत शिर्डीच्या सुपर हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत्य घोषित केले. तरुणाच्या मृत्यूमुळं जमाव आक्रमक झाल्याने काहीकाळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

नेमकं काय घडलं होतं?

साईनाथ याने रुपाली लोंढे हिच्या बहिणीला इस्टाग्रामवरुन मेसेज करुन शिवीगाळ केली होती. त्याचाच राग मनात धरून आरोपी 1) रुपाली संजय लोंढे 2) अनिल संजय लोंढे 3) दिनेश विठ्ठल आसने 4) राहुल अशोक चांदर आणि एक अल्पवयीन बालक हे साईनाथ राहत असलेले ठिकाणी पुणे येथे गेले व त्याला घरातून ओढत आणले. त्यानंतर गाडीमध्ये टाकून कोकमठाण येथे घेवून गेले. याबाबत पुण्यातील सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहे.

तालुक्यातील कोकमठाण येथे तरुणाला मुलीच्या घरच्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर त्याला काहीतरी विषारी औषध पाजले गेलंय. या घटनेबाबत कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 251/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) 140 (1),189 (2) 191 (2) प्रमाणे पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत साईनाथ आणि आरोपी यांची पूर्वीपासूनच ओळख असल्याने नेमकं काय घडलं.? ज्यामुळे थेट हत्या करण्यात आली. या बाबत अधिक तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *