तिथे दिसता क्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश, मुंबईतील मच्छिमारांना सरकारचा सज्जड इशारा

राज्यातील मत्स्य व्यवसाय विभागाने मच्छीमारांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. मासेमारी करताना काही गोष्टी टाळण्याबाबत इशारा देण्यात आला आहे. समुद्रातील संरक्षण विभागाच्या क्षेत्रात मासेमारी करु नका, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. यासोबत तेल विहिरींजवळ मासेमारी न करण्याचे आणि वादळात त्यांच्याजवळ आश्रय न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “ऑफशोर डिफेन्स एरियामध्ये शूट टू किल अर्थात दिसताक्षणीच गोळी झाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत” त्यामुळे मच्छीमारांनी सहकार्य करावे, असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभागाने केले आहे.

राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांना काही सूचना दिल्या आहेत. समुद्रातील काही विशिष्ट ठिकाणी मासेमारी करण्यास मनाई करण्यात आली आहे. ही क्षेत्रे नौदल आणि तटरक्षक दलाच्या देखरेखेखाली आहेत. त्यामुळे या भागात मासेमारी करणे धोक्याचे ठरू शकते. या संदर्भात काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *