जळगावातील पाचोरा तालुक्यात अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथील दोन मुलांचा मृत्यू झाला असून त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. अंतुर्ली बुद्रुक शेती शिवारातील शेततळ्यात बुडुन एका २१ वर्षीय आणि एका १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे
दोन मुलं शेततळ्यात बुडाली असल्याचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी रुग्ण वाहिका चालक निळकंठ पाटील आणि सागर पाटील यांच्या मदतीने दोन्ही मुलांना बाहेर काढून तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केलं.
