भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे काही शहरांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या रेडारवर भारतातील धार्मिक स्थळ असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाल्यानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात काल रात्रीपासून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या बंदोबस्तात अतिरिक्त पोलीस, SRPF, दंगल नियंत्रण पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक सहभागी होते. केवळ दगडूशेठ मंदिराच नव्हे तर पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा परिसरातही सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. काल (8 मे) रात्रीपासून पुण्यात बंदोबस्त तगडा करण्यात आला आहे.
