दरम्यान, औद्योगीकीकरण आणि शहरीकरण यामुळे शेतीक्षेत्र घटत असले तरी शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे पिकांची उत्पादकता वाढवण्यावर भर द्या असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यावेळी कृषी अधिकाऱ्यांना दिले.

नाविन्यपूर्ण पिकांची लागवडीचे प्रयोग होणार

नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत यावर्षी जिल्ह्यात हळद, लाल आणि काळ्या रंगाचा भात, कणघर, ड्रॅगन फ्रुट, करटोली, काळीमिरी आणि मोगरा या पिकांची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा तालुक्यात ही लागवड केली जाणार आहे.

शेतकऱ्यांची लगबग…

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी देखील कामाला लागला आहे. पावसाळ्यापूर्वीची मशागतीची कामे शेतकऱ्यांनी सुरु केली आहेत. दक्षिण रायगडात धूळपेरणीची कामे सुरु झाली आहेत. बांधबंदिस्ती , चर मारणे, तसेच शेतीच्या मशागतीची कामे देखील सुरु झाली आहेत.

पिक कर्ज वाटपात राजकारण नको…

खरीप आढावा बैठकीत खासदार धैर्यशील पाटील यांनी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पिक कर्ज वितरणात होत असलेल्या राजकारणाबद्दल नाराजी व्यक्त केली. सुधागड तालुक्यात कर्ज वितरण करताना शेतकऱ्यांची अडवणूक झाल्याचे त्यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांच्या निदर्शनास आणून दिले. कर्ज वितरणात कुठल्याही परिस्थितीत राजकारण येऊ देऊ नका असा सल्ला त्यांनी दिला.