वाघाने फक्त पंजा उगारलाय, अजून जबडा उघडायचाय; योगेश कदमांनी ललकारलं, म्हणतात POK ही ताब्यात…

भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला, आता तरी पाक शिकवण घेईल, अशी आशा आहे. ही फक्त पहिली कारवाई आहे, वाघाने फक्त पंजा उगारला आहे, अजून जबडा उघडायचा बाकी आहे, पण आम्हाला समाधान मिळालं आहे, भारतीय म्हणून हीच भावना वाटते, की पाकव्याप्त काश्मीर लवकरच ताब्यात घ्यावं, अशा भावना ऑपरेशन सिंदूरनंतर योगेश कदम यांनी व्यक्त केल्या.
भारत एक विचार घेऊन पुढे जात आहे, तो दहशतवादविरोधी विचार आहे, दहशतवाद संपवण्याचा विचार आहे. शेजारी देश जर दहशतवाद्यांना आश्रय देत असेल, त्यामुळे भारताचं नुकसान होत असेल, गृहराज्यमंत्रिपद दुय्यम आहे, पण भारतीय नागरिक म्हणून वाटतं की पाकव्याप्त काश्मीर लवकरच ताब्यात घ्यावं आणि कायमचा धडा शिकवावा, असंही योगेश कदम म्हणाले.

भारत आणि लष्कर सक्षम आहेत, भारताची ताकद पाहता पाकिस्तान प्रत्युत्तर देण्याऐवजी एकटा पडताना दिसत आहे, कारण चीनचाही पाठिंबा त्यांना मिळताना दिसत नाही. लवकरच पाकिस्तान पांढरे निशाण फडकवेल. अमेरिकेसह सगळेच देश भारताला पाठिंबा देतील, अशी आशाही योगेश कदम यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *