मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुस्साट! BKC ते शिळफाटा दरम्यान बोगदा, तीन मजली टर्मिनस; कोणत्या स्टेशन्सवर थांबणार?

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे-कुर्ला संकुलातील बुलेट टर्मिनसचे खोदकाम ७६ टक्के पूर्ण झाले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईतील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांचा आढावा शनिवारी घेतला. हा बुलेट ट्रेन प्रकल्प ‘नॅशनल हाय स्पीड रेल कॉरिशन लिमिटेड’ (एनएचएसआरसीएल) कडून उभारण्यात येत आहे.

– बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भुयारी टर्मिनसचे ७६ टक्के खोदकाम पूर्ण. १८.७ लाख घनमीटर पैकी १४.२ लाख घनमीटरचे खोदकाम पूर्ण करण्यात आलं आहे.

– जमिनीबाजूच्या भिंतींच्या मजबूतीकरणाचे काम पूर्ण. २.७ लाख घनमीटर काँक्रीटचे कामही पूर्ण झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *