सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर देगाव तांडा येथील पंपावर पेट्रोल भीषण अपघात झाला. राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस मतदारसंघातील आमदार उत्तम जानकर यांच्या मुलाच्या स्कॉर्पिओ गाडीने अचानक पेट येतला. प्रसंगावधान राखून गाडी तातडीने पेट्रोल पंपाच्या बाहेर आणण्यात आली. मोठ्या चपळाईने जीवन जानकर गाडीतून उतरल्याने मोठी दुर्घटना टळली.
धूर निघत असतानाही जीवन जानकर यांनी आटोकाट प्रयत्न करत स्कॉर्पिओ गाडी पंपाच्या बाहेर आणली. गाडीला पंपावरच आग लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. अत्यंत ज्वलनशील असलेले पेट्रोल आणि डिझेलच्या टाक्या जवळ होत्या, त्यामुळे जानकर यांनी अवघ्या काही सेकंदात गाडी पंपाच्या बाहेर काढली, त्यामुळे दुर्घटना टळली.
