मुंबईतल्या तरुणीला ट्रकने चिरडले, ओव्हरटेक करण्याच्या नादात गेला जीव! अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

मुंबईत सोमवारी एक भयंकर अपघात झाला आहे. ट्रकखाली चिरडून एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रखरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सोमवारी दुपारी दक्षिण मुंबईतील व्हीपी रोडवर एका दुचाकीने ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. पण दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने चालकाने अचानक ब्रेक लावला त्यामुळं दुचाकी घसरली अन् ट्रकच्या चाकाखाली आली. त्यानंतर दोन्ही तरुणी खाली पडल्या. दुचाकीवर मागे बसलेली तरुणी ट्रकच्या चाकाखाली चिरडली  गेली. तिला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिचा आधीच मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघाताचा हा थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मयत मुलीचे नाव सिया मेहता असे असून ती 18 वर्षांची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिया तिची मैत्रिण दिनिका बाफनासोबत सीपीटँक सर्कलवरुन कुंभार वाड्यावर जात होती. दिनिका त्यावेळी स्कुटर चालवत होती. दिनिकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचेही उघड झाले आहे.  रस्तावर रहदारी नसल्यामुळं जी वेगाने गाडी चालवत होती. डाव्या बाजूने येणाऱ्या ट्रकल ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र दिनिकाने अचानक ब्रेक लावल्याने स्कुटर घसरली आणि दोघीही खाली कोसळल्या. ट्रकचे मागचे चाक डोक्यावरुन गेल्याने सिया गंभीर जखमी झाली होती. त्यातच तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *