पाकिस्तानच्या लाहोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे लाहोर विमानतळावरील विमानाची सर्व उड्डाणं तात्काळ रद्द करण्यात आली आहेत. या आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या आगीमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे.
लाहोर विमानतळावर अग्नितांडव
लाहोर विमानतळ हे पाकिस्तानामधील अति महत्त्वाचं विमानतळ आहे. याच आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशाप्रकारे आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. या आगीमागचं नेमकं कारण काय हे अद्याप समोर आलेलं नाही. आग विझवण्याचं, आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. विमानतळावर अनेक नागरिक उपस्थित आहेत. तेथील प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. प्रवाशांमध्ये या आगीच्या घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला आहे.
विमानतळावरील या अग्नितांडवामुळे पाकिस्तानची विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आग लागल्यानंतर तेथील भागातही मोठी खळबळ उडाली आहे.
