प्रभादेवी पूल अखेर बंद होणार, तारीख ठरली; मुंबई पोलिसांनी जारी केला आदेश

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील परळ आणि प्रभादेवीला जोडणारा प्रभादेवी पूल अखेर बंद होणार आहे. 125 वर्ष जुना हा ब्रिटिशकालीन प्रभादेवी पूल अखेर पाडला जाणार आहे. मागील अनेक दिवसांपासून हा पूल पाडण्याची तारीख पुढे ढकलली जात होती. कधी विद्यार्थ्यांची परीक्षा तर कधी स्थानिकांचा विरोध यामुळे हे पाडकाम स्थगित होत होतं. पण आता अखेर 25 तारखेच्या रात्री 9 वाजल्यापासून प्रभादेवी पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. नागरिकांकडून हरकती मागवल्यानंतर त्यानुसार उपाययोजना करून प्रभादेवी पूल शुक्रवापासून बंद करण्यात येणार असल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

एमएमआरडीएने प्रभादेवीचा पूल पाडून नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन पूल बांधण्यासाठी सुमारे दोन वर्षं लागणार आहेत. मात्र हा पूल बंद झाल्यानंतर मुंबईकरांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार आहे. तसंच हा पूल बंद झाल्याने दादर, परळ, करी रोड, लालबाग येथे मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरं जावे लागणार आहे.

दक्षिण मुंबईतील दादर येथील टिळक पूल आणि लोअर परळ येथे झालेल्या डिलाईल रोड पूलाला समांतर असलेला हा पूल पाडल्यानंतर या दोन पूलावर वाहतुकीचा ताण वाढू शकतो. सायन पूल आधीच बंद असल्यामुळे वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे.

उपाययोजना काय – 

1) दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी टिळक ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना

2) लोअर परळ, प्रभदेवी पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येण्यासाठी नव्याने बांधण्यात आल्या करी रोड ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना

3) भायखळा पूर्वेकडून कोस्टल रोड, सीलिंक कडे जाण्यासाठी चिंचपोकळी ब्रिज किंवा एस ब्रिजचा वापर करण्याच्या सूचना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *