वस्तू देण्यासाठी आलेल्या डिलेव्हरी बॉयने विवाहित महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार गिरगाव परिसरात घडला. याप्रकरणी वि. प. रोड पोलिसांनी आरोपीला शनिवारी अटक केली. आरोपी चेंबूर येथील रहिवासी असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
शाहरूख शेख मोहम्मद शेख (२९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो चेंबूर येथील रहिवासी आहे. आरोपी खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपनीत डिलेव्हरी बॉय म्हणून कामाला आहे. पीडित २८ वर्षीय महिला कुटुंबियांसोबत गिरगाव येथे राहते. २१ मार्चला त्यांनी काही वस्तू ऑनलाईन ऑप्लिकेशनद्वारे मागवल्या होत्या. पण बराच वेळ झाला, तरी डिलेव्हरी बॉय न आल्यामुळे त्यांनी दोन वेळा आरोपी डिलेव्हरी बॉयला दूरध्वनी केला होता. पण नेटवर्क नसल्यामुळे आरोपीशी व्यवस्थित बोलणे झाले नाही. अखेर आरोपी रात्री महिलेच्या घरी वस्तू घेऊन आला.
