इमर्जन्सीतील कुठल्याही पेशंटकडून एक रुपयाही डिपॉझिट घेणार नाही, दीनानाथचे वैद्यकीय संचालक डॉ. केळकर यांचा मोठा निर्णय

वैद्यकीय हलगर्जीमुळे तनिषा भिसे यांचा प्रसुतीपश्चात मृत्यू झाल्याचा आरोप पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला. त्यानंतर दीनानाथ रुग्णालयाबाहेर राजकीय पक्षांनी आंदोलनं केली. प्रशासनाने चौकशी समिती स्थापन करत अहवालही सादर केला. अशातच वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे इमर्जन्सी रुग्णाकडून कुठलीही अनामत रक्कम जमा करुन घेतली जाणार नाही, असा दिलासादायक निर्णय डॉ. केळकर यांनी पत्र जारी करत जाहीर केला आहे.

काय आहे पत्र?

माझ्या प्रिय बंधू व भगिनींनो,
2001 साली दीनानाथ रुग्णालयाची सुरुवात झाली. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रेरणेने व आदर्शवादाच्या उद्देशाने हे रुग्णालय सुरू झाले. हे रुग्णालय इतरांपेक्षा वेगळे आहे कारण यामध्ये सचोटी, कमिशन प्रॅक्टिसला अजिबात थारा न देणे, फार्मा इंडस्ट्री कडून कोणतेही पैसे व स्पॉन्सरशिप न घेणे, पेशंट कडून नियंत्रित दरामध्ये व शिस्तीमध्येच सर्व व्यवहार करणे, जेनेरिक औषधे उपलब्ध करून देणे, पारदर्शकता व आलेल्या सर्व गरीब व गरजू रुग्णांची मदत करणे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर सतत जागती ठेवून वाटचाल करण्यात आली. दिवसेंदिवस दीनानाथ रुग्णालयाची प्रगती वाढतच गेली व आजमितिला ८५००० आंतररुग्ण दरवर्षी, पाच लाख बाह्य रुग्ण आणि तीस हजार मोठ्या शस्त्रक्रिया रुग्णालय रुग्णांच्या विश्वासावरच करीत आहे. यामध्ये गरीब रुग्णांना रोज दहा रुपयांमध्ये कुठल्याही विभागाचा केस पेपर, रोज ५० टक्के सवलतीत सर्व तपासण्या व दारिद्य रेषेखालील रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया या केल्या जातात आणि त्याची दर महिन्याला charity कमिशनरला पूर्ण यादी पुरवली जाते. स्वाईन फ्लू कोविड व आताच होऊन गेलेला जीबीएस वा गियाबारी सिंड्रोम या सर्व साथींच्या आजारात रुग्णालयाने अतिशय निस्पृहपणे विलक्षण काम केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *