महाबळेश्वर महापर्यटन महोत्सवाला राज्यपाल येणार

‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५’ मोठ्या स्वरूपात साजरा होणार आहे. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन दि. ३ मे २०२५ रोजी महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी ‘महाबळेश्वर महापर्यटन महोत्सव २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणारे लेझर शो, टेंट सिटीचे आयोजन, विविध परिसंवाद, देशभरातील पर्यटन उद्योगातील तज्ज्ञ, ट्रॅव्हल एजंट्स आणि गाईड्स यांचा एक विशेष परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम याची माहिती राज्यपालांना दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मे रोजी उद्घाटन होणार आहे. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *