जुन्या कोयना पुलाच्या जागी सुसज्ज चारपदरी पूल, आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून ५० कोटी मंजूर

कराडला पुणे-बंगळूरू महामार्गाशी जोडणाऱ्या आणि ब्रिटिशांनी कोयना नदीवर उभारलेल्या कराडच्या १५४ वर्षे जुन्या कोयना पुलाच्या सक्षमतेची हमी संपली असून, तो केवळ हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठीच खुला आहे. परंतु, लवकरच हा पूल कात टाकणार आहे. आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रयत्नातून जुन्या कोयना पुलासाठी ५० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

याबाबतच्या पत्रकात म्हटले आहे, की स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश राजवटीने सन १८७१ च्या सुमारास जुन्या कोयना पुलाची उभारणी केली. कराडला जोडणारा हा प्रमुख दुवा राहिला. लोखंडी व दगडी बांधकाम असणारा हा पूल कमानी स्वरूपाचा असल्याने त्याची वेगळी ओळख आहे. नदीपात्रातील बांधकामही दगडी असून, वरील भाग लोखंडी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *