भिवंडीत 6 महिन्याच्या चिमुकल्यावर स्लॅब कोसळला, जागीच मृत्यू, आई गंभीर जखमी

भिवंडी शहरातील नायगांव परिसरातील अन्सारी अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील घराच्या छताचे प्लास्टर कोसळून सहा महिन्याच्या चिमुकल्याचा निष्पाप दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर या दुर्घटनेत चिमुकल्या बाळाची आई देखील गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे.

नायगांव परिसरातील अन्सारी अपार्टमेंटच्या तळमजल्यावर राहणाऱ्या या कुटुंबावर अचानक छताचे प्लास्टर कोसळले. त्यात घरात झोपलेल्या आई व बाळ गंभीर जखमी झाल्याने त्याना लगेच उपचारासाठी तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सहा महिन्याच्या चिमुकल्या बाळाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तर या घटनेत आई जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेमुळे भिवंडी शहरातील अनेक जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या देखभाली बाबत प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले‌ जाऊ लागले आहे. भिवंडी महानगरपालिका प्रभाग समिती एकमध्ये अनेक जुन्या इमारती आहेत. ज्या धोकादायक स्थितीत असून त्यांची वेळोवेळी तपासणी व दुरुस्ती होत नाही. त्यामुळे परिणामी अशा दुर्घटना या परिसरात वारंवार घडत आहेत. भिवंडीमधील या घटनेमुळे सध्या परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर येथील स्थानिक नागरिकांनी मनपा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी भिवंडी शहरातील धोकादायक इमारतींची तत्काळ तपासणी करून सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे.भिवंडी शहरातील या घटनेनंतर पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा अधिक तपास शांतीनगर पोलिसांकडून सुरू आहे.

या घटनेनंतर नायगांव परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महानगरपालिका ही फक्त कर वसुली करते पण या परिसरात राहत असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत जबा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *