कन्नडच्या घाटात ट्रकखाली दबून सहा ऊसतोड मजुरांचा मृत्यू; ९ गंभीर

ट्रकवर बसून साखर कारखान्याकडे जात असताना अचानक ट्रक पिशोर- कन्नड मार्गावरील घाटात उलटून झालेल्या अपघातात दबल्या गेल्याने सहा ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला. रविवारच्या मध्यरात्री ही घटना घडली असून, यामध्ये ९ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पिशोरचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांनी दिली.

टूकवर बसून १७ मजूर प्रवास करत होते. ओझ्यानेच ट्रक कलंड्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून, मृत व जखमी हे शेजारच्या राज्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मजुरांचे आधारकार्ड गोळा करून ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *