सहकारनगरमध्ये महिलेकडील एक लाखांची रोकड चोरी

दुचाकीस्वार महिलेकडील एक लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सहकारनगर भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला तळजाई वसाहत भागात राहायला आहेत. त्या बुधवारी (५ मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास सहकारनगर भागातून दुचाकीवरुन मुलासोबत निघाल्या होत्या. महिलेने बँकेतून एक लाखांची रोकड काढून पिशवीत ठेवली होती.

विद्या विकास शाळेजवळ दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या हातातील रोकड असलेली पिशवी हिसकावून पोबारा केला. पिशवी हिसकावताच महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून , पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *