असेही पोलीस असतात तर, वृद्धाची पुंजी हरविली आणि यांनी ती गवसल्यावर…

उतारवयात पैश्याची काठी मजबूत असावी, हेच खरे. वृद्धाश्रम नको आणि स्वाभिमानी मनाने जगायचे तर हक्काची पुंजी हवी. तीच हरविली तर मग कठीणच. अज्ञात स्थळी ती पोलीसांच्या हाती लागली. दीड लाख रुपयाची पुंजी हाती आली. आणि पोलिसांना काय करावे तर त्याचा शोध घेणे सूरू केले. मग वृद्धच्या डोळ्यातील दुःखाश्रू निवळले आणि आनंदाश्रू ओघळले.

अशीच माणुसकीचे प्रत्यन्तर देणारी सत्यकथा. झाले असे की हिंगणघाट शहर पोलीस रात्रीची गस्त घालण्यास फिरतीवर होते. कारण शहरात चोऱ्यांचे प्रमाण सतत वाढू लागले होते. पोलीस हवालदार नरेंद्र डहाके व आकाश कांबळे तसेच वाहनचालक रवी पांडे मिळून रात्रीच्या पेट्रोलिंगवर होते. एफ बी टाउन परिसरात त्यांची गाडी असतांना रस्त्यालगत त्यांना एका झाडाजवळ दोन काळ्या रंगाच्या बॅग आढळून आल्यात. ही बाब संशयास्पद वाटली. चोऱ्या होत असल्याने चोरट्यानी या बॅगा चोरी करीत लपवून ठेवल्या असल्याचा संशय आला. पोलिसांची गाडी पाहून या बॅगा इथेच लपवून चोरटे पळून गेल्याची शंका आली. या बॅगा तपासून त्या ताब्यात घेण्याचे ठरले. तपासणी केल्यावर त्यात चक्क रोख रक्कम सापडली. मोजल्यावर ती रक्कम १ लाख ७५ हजार रुपये एव्हढी भरली. तसेच एक चांदीचा शिक्का पण होता. हे एव्हढे पैसे कोण सोडून गेला असावे, असा प्रश्न पडला. नक्कीच हा चोरीचा मामला, असा ग्रह झाला. बॅग उलट सुलट करण्यात आली तेव्हा त्यात एक बँकेचे पासबुक दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *