मुंबई उच्च न्यायालय यांच्याकडील जनहीत याचिका मधील आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात व सावंतवाडी तालुक्यातील एकूण १३ गावांमध्ये वृक्षतोडीस बंदी घातली असल्याची माहिती सावंतवाडी दोडामार्ग टास्क फोर्स समिती तथा सहाय्यक वनसंरक्षक, सदस्य सचिव वैभव बोराटे यांनी दिली आहे.
अवैधरित्या होणाऱ्या वृक्षतोडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सावंतवाडी – दोडामार्ग Task Force समिती तयार करण्यात आलेली आहे. या समिती मध्ये महसूल विभाग, वन विभाग व पोलीस विभाग मधील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सावंवाडी – दोडामार्ग Task Force समितीचे अध्यक्ष हे उपविभागीय अधिकारी सावंतवाडी असून सदस्य सचिव सहाय्यक वनसंरक्षक हे आहेत. त्याचबरोबर या समितीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार सावंतवाडी, दोडामार्ग हे सदस्य आहेत. ही समिती उच्च न्यायालयाकडील आदेशानुसार वृक्षतोडीस प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये संबंधित विभागांनी वृक्षतोडीस प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही, प्रचार- प्रसिध्दी व प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीचा दरमहा आढावा घेतला जातो.
