१५१ घोरपडींच्या गुप्तांगांची तस्करी सोलापुरात पकडली; तिघांना अटक

वन्यजीव संरक्षण कायद्याखाली सर्वोच्च संरक्षण देण्यात आलेल्या घोरपडींना मारून त्यांच्या गुप्तांगांची होणारी तस्करी सोलापुरात पकडण्यात आली. सोलापूर रेल्वे स्थानकात झालेल्या या कारवाईत तिघाजणांकडून १५१ घोरपडींचे गुप्तांग हस्तगत करण्यात आले. या गुप्तांगांचा वापर अंधश्रद्धेपोटी काळी जादू किंवा वनौषधीसाठी केला जातो, अशी माहिती समोर आली आहे.

या कारवाईत विठ्ठल सुग्रीव पाटोळे (वय २९), त्याचे वडील सुग्रीव रंगनाथ पाटोळे (वय ६०, रा. पिंपळा वडवणी, जि. बीड) आणि बाळासाहेब लक्ष्मण डोरले (वय ३४, रा. चिखल, बीड) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरूद्ध वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *