“आरोपीच्या गळ्यावर दोरीचे वळ, आत्महत्येचा प्रयत्न केल्याची शंका”, पुणे पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती!

पुणे येथील स्वारगेट बस स्थानकातील उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या अखेर मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू असून त्याची माहिती आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना दिली.

पुणे पोलीस आयुक्त म्हणाले, “प्राथमिक वैद्यकीय चाचणीनुसार आरोपीच्या गळ्यावर दोरीचे वळ आहेत, या वळानुसार त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असं आरोपीने सांगितलं आहे. परंतु, दोरी तुटल्यामुळे आणि इतर लोक आल्यामुळे त्याचा जीव वाचला.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *