मुलानेच चोरले वडिलांच्या तिजोरीतील तीन कोटी रुपयांचे हिरे

ऑपेरा हाऊस येथील पंचरत्न इमारतीमधील ५७ वर्षीय हिरे व्यापाऱ्याच्या कार्यालयातील तिजोरीतून तीन कोटी रुपयांचे हिरे चोरीला गेले असून याप्रकरणी सीसी टीव्हीची तपासणी केली असता चोर दुसरा-तिसरा कोणी नसून व्यापाऱ्याचा मुलगाच असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग (डी.बी. मार्ग) पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीने चौकशीत दिलेल्या माहितीवरून लवकर चोरीला गेलेले हिरे हस्तगत करण्यात येतील, असे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

लोअर परळ येथील सेनापती बापट मार्गावरील लोढा वर्ल्ड क्रेस्ट या इमारतीत वास्तव्यास असलेले तक्रारदार विपूल धीरजलाल जोगाणी (५७)  हिऱ्यांचे प्रसिद्ध व्यापारी असून त्यांचे ऑपेरा हाऊस येथील पंचरत्न इमारतीत कार्यालय आहे. या कार्यालयातून हिऱ्यांची खरेदी-विक्री केली जाते. त्यामुळे कार्यालयात तिजोरी ठेवण्यात आली आहे. त्यात मौल्यवान हिरे ठेवण्यात येतात. पंचरत्न इमारतीत हिरे व्यापाऱ्यांची कार्यालये असल्यामुळे इमारतीत सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *