महत्त्वाकांक्षी अशा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील निकषांचे उल्लंघन करीत गैरफायदा घेतलेल्या पाच लाख बहिणींना सरकारने अपात्र ठरविले आहे. त्यांच्याकडून सहा महिन्यांच्या अनुदानाची नऊ हजार रुपयांची रक्कम वसूल केली जाणार नाही असे स्पष्ट करण्यात आले.
विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या किंवा चार चाकी वाहने असलेल्या पाच लाख महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात आल्याची घोषणा महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी केली. निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही छाननी न करता आलेले अर्ज स्वीकृत करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपयांचे अनुदान पात्र महिलांना दिले जाते. आतापर्यंत सुमारे दीड लाख महिलांनी स्वेच्छेने या योजनेतून माघार घेतली आहे. सरकारच्या या योजनेला २ कोटी ६३ लाख लाडक्या बहिणींनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ कोटी ४१ लाख महिला पात्र ठरल्या होत्या. अजूनही ११ लाख अर्जांची छाननी प्रलंबित असून ११ लाख अर्जांची आधारशी जोडणी प्रलंबित आहे
