नाशकात ८ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू, अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे उघड, ११ वर्षीय मुलगा ताब्यात

आठ दिवसांपूर्वी उपनगर हद्दीतील गंधर्वनगरी येथील निर्माणाधीन इमारतीच्या खड्ड्यात संशयास्पदरीत्या मृतदेह आढळलेल्या आठ वर्षीय दिव्यांग बालकाचा खून नव्हे, तर उंचावरुन पडल्याने मृत्यू झाल्याची बाब पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानुसार त्या बालकासोबत वारंवार अनैसर्गिक कृत्य झाल्याचे पोलिसांच्या तपासातही समोर आले आहे.

एका अल्पवयीन मुलाचा या कृत्यात सहभाग असून, ‘चाइल्ड पोर्नोग्राफी’ बघून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. या विधिसंघर्षित बालकाची चौकशी पूर्ण झाली असून, पोलिस पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत.

काय आहे प्रकरण?

दि. १९ जानेवारी रोजी रात्री आठ वर्षीय बालकाचा संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाल्यानंतर २० जानेवारी रोजी शवविच्छेदन करण्यात आले. त्यात बालकाच्या छातीला गंभीर दुखापतीसह बरगड्या तुटल्याचे आढळले. त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचेही शवविच्छेदनातून समोर आल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *