नऊ परदेशी आरोपीं विरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे.टोरेस गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने नऊ परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे. त्यात आठ युक्रेनचे व एक तुर्कस्थानचा नागरिक आहे.याप्रकरणातील मुख्य आरोपीने २०० कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे. टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी पसार झालेला तौसिफ रियाज उर्फ जॉन कार्टर याचा अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही.या प्रकरणाचा गुंता सोडविण्यासाठी तौफिक सापडणे गरजेचे आहे.त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत असून तो कुठे दिल्यास संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे
