कोल्हापुरच्या ज्योतिबा डोंगरावरील प्रसादात आढळलं ब्लेडचा तुकडा

देवस्थानच्या ठिकाणी आपण खात असणारा प्रसाद सुरक्षित आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंद्यात चक्क ब्लेडचा तुटलेला तुकडा आठळून आला आहे. त्यामुळे देवस्थानच्या ठिकाणी मिळत असणारा प्रसाद नक्की सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय.  यापूर्वी देखील ज्योतिबा मंदिर परिसरात तब्बल दोन टन भेसळयुक्त खवा आणि पेढा आढळून आला होता, या संदर्भात अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली, पण त्याचे पुढे काय झालं याबाबत मात्र अन्न आणि औषध प्रशासनाने कोणतीच माहिती दिली नसल्याच तक्रारदाराने म्हटले आहे.

मिठाई दुकानातून घेतलेल्या प्रसादा मध्ये ब्लेड : 

कोल्हापूरच्या ज्योतिबा डोंगरावरील प्रसादात आढळलेलं ब्लेडचा तुटलेला तुकडा हे ज्योतिबा डोंगरावरील शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून घेतलेल्या प्रसादा मध्ये आढळलं आहे. संबंधित दुकानदारासह अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी केली आहे. प्रसादात ब्लेड आढळल्याने भाविकांमध्ये घाबराहटीचे वातावरण निर्माण झालं आहे.

चार दिवस ज्योतिबा मंदिर बंद :  

कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबाच्या मूर्तीची उद्यापासून संवर्धन प्रक्रिया सुरू होणार. 21 ते 24 जानेवारी दरम्यान चार दिवस ही संवर्धन प्रकिया चालणार आहे. ज्योतिबाच्या मूळ मूर्तीचे जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या वतीने ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्योतिबाची मुख्य मूर्ती प्राचीन दगडापासून बनलेली आहे. या मूर्तीवर वर्षानुवर्ष होत असलेल्या अभिषेकामुळे मूर्तीची झीज झाली आहे, त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने राज्य आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला संपर्क करून मूर्तीची पाहणी करण्याची विनंती केली होती. या पाहणीनंतर पुरातत्व विभागाने मूर्तीच्या संवर्धनाची प्रक्रिया गरजेचे असल्याचे नमूद केला होत, त्यानुसार उद्यापासून ही संवर्धन प्रक्रिया सुरू होणार आहे, यादरम्यान भक्तांसाठी ज्योतिबाची उत्सव मूर्ती मंदिरातील कासव चौकात ठेवली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *