एका पराठ्यामुळे सापडला सैफचा हल्लेखोर; पोलिसांच्या जाळ्यात कसा अडकला? वाचा घटनाक्रम!

अभिनेता सैफ अली खान यांच्यावर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद ऊर्फ विजय दास(३०) गेल्यावर्षी वरळी कोळीवाड्यातील पबमध्ये कामाला होता. त्यावेळीही त्याने एका ग्राहकाची हिऱ्याची अंगठी चोरली होती. याप्रकरणात आरोपी शरीफुल उर्फ दासचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात त्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती या प्रकरणाशी संबंधीत व्यक्तीने दिली.

सैफ अली खानवर हल्ला करणारा शरीफुल उर्फ दास गेल्यावर्षी मुंबईतही वास्तव्याला होता. त्यावेळी आरोपी वरळी कोळीवाड्यातील एका पबमध्ये काम करत होता. शरिफुल थोडा विक्षीप्त होता, बोलायला चांगला होता. तो हाऊस किपिंगमध्ये काम करायचा. त्याच्या कामाबाबत काहीच प्रश्न नव्हता. पण ऑगस्ट २०२४ ला पबमध्ये आलेल्या एका ग्राहकाची हिऱ्याची अंगठी चोरीला गेली होती. त्या ग्राहकाने पबच्या व्यवस्थापनाला माहिती देऊन नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तातडीने तपासणी करण्यात आली. आरोपी दासने अंगठी चोरल्याचे समजले उघडकीस आले. त्यानंतर तात्काळ त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *